

पुणे: गिरिप्रेमी या भारतातील अग्रणी गिर्यारोहण संस्थेच्या ‘पी क्यूब माउंट मेरू’ या ही चढाई होणार असून या मार्गाने या आधी भारतीय मोहीम आयोजित केलेली नाही. त्यामुळे शिखर चढाई यशस्वी झाल्यास अशी कामगिरी करणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल. ही तब्बल ४० दिवसांची असून गिर्यारोहकांना शुभेच्छा देण्यासाठी गिरिप्रेमीचे सदस्य व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आधी गिरिप्रेमीने जगातील १४ पैकी आठ अष्टहजारी शिखरांना गवसणी घातली आहे. यात एव्हरेस्ट, कांचनजुंगा, अन्नपूर्णा यांसारख्या खडतर शिखरांचा समावेश आहे. सोबतच माउंट मंदा या भारतीय हिमालयातील शिखरावर देखील यशस्वी मोहीम करण्यात गिरिप्रेमीला यश आले आहे. या सर्व मोहिमांचे नेतृत्व श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी केले असून माउंट मेरू मोहिमेचे नेतृत्व देखील झिरपे हेच करणार आहेत. या संघामध्ये अनुभवी व निष्णात गिर्यारोहकांचा समावेश आहे. पाच अष्टहजारी शिखरांना गवसणी घालणारा आशिष माने, अन्नपूर्णा, कांचनजुंगा, च्यो ओयू सारख्या शिखरांवर चढाई करणारा डॉ. सुमित मांदळे, एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखर चढाई यशस्वी करणारा कृष्णा ढोकले, कांचनजुंगा, अमा दब्लम, माउंट मंदा शिखरांवर तिरंगा फडकविणारा विवेक शिवदे, माउंट मंदावर यशस्वी चढाई करणारा पवन हाडोळे व निष्णात प्रस्तरारोहक व नवोदित गिर्यारोहक वरुण भागवत हे गिर्यारोहक माउंट मेरू शिखरावर चढाई करतील. तसेच गिरिप्रेमीचे सदस्य व हिमालयन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंगचे माजी उपप्राचार्य विंग कमांडर देवीदत्त पंडा यांचा देखील या मोहिमेत समावेश आहे. उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग या प्रख्यात संस्थेचे प्रमुख इंस्ट्रक्टर्स विनोद गुसैन व हवालदार लाले पुन हे देखील या मोहिमेत निमंत्रित गिर्यारोहक म्हणून सहभागी होणार आहेत. मोहिमेच्या सपोर्ट टीममध्ये अखिल काटकर, अभय खेडकर व निकुंज शाह यांचा समावेश आहे.
पी क्यूब संस्थेने मोहिमेचे मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले असून ‘वर्ल्डवाईड ऑइलफिल्ड मशीन,’ हावरे बिल्डर्स, जिप्सी टेन्ट्स, आयसीआरसी, पाळंदे कुरियर्स, परिमल व प्रमोद चौधरी फाऊंडेशन, नमः रोप्स यांच्यासोबत इतर अनेक हितचिंतकांचा मोहीम उभारण्यात मोठा हातभार लागला. या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वाद घेऊन संघ ११ मे रोजी पहाटे पुण्यातून डेहराडूनकडे रवाना झाला.
माउंट मेरू विषयी : उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालयात माउंट मेरू हे शिखर वसलेले आहे. ६६६० मीटर उंच असलेले माउंट मेरू हे थलाई सागर व शिवलिंग या पर्वत शिखरांच्या मध्ये विराजमान आहे. गिर्यारोहण जगतामध्ये ‘एव्हरेस्ट पेक्षाही चढाईसाठी कठीण’ अशी माउंट मेरूची ख्याती आहे. जगभरातील हाडाचे गिर्यारोहक माउंट मेरू शिखरावर चढाई करण्यास मोठ्या तयारीने येतात, मात्र या शिखराने अत्यंत कमी गिर्यारोहकांना आपलंसं करून शिखर चढाई करण्यात यश मिळू दिले आहे. मेरू पर्वताची एकूण तीन शिखरे आहेत, उत्तर, मध्य व दक्षिण. दक्षिण शिखर ६६६० मीटर उंच आहे, तर मध्य शिखर ६३१० मीटर उंच आहे. उत्तर शिखराची उंची ६४५० मीटर इतकी आहे. मध्य शिखर तिन्ही शिखरांत उंचीने कमी असले तरी चढाईसाठी सर्वात अवघड शिखर तेच आहे.
मेरू हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ पर्वत किंवा शिखर असाच होतो. पौराणिक कथांमध्ये, पुराणांमध्ये सर्वोच्च बिंदू किंवा शिखर असे संबोधायचे असल्यास मेरू असा वापर केला जात असे. उंचीवरील ठिकाण, शिखर म्हणूनच या पर्वताचे नाव माउंट मेरू असे करण्यात आले असेल, असे मानले जाते.
#MountMeru #Climbing #Sports #Sportsindi #India #Sportsmedia #sportsnews #sportsupdates #PCubeMountMeru #Meru