पुणे, 17 मार्च 2023: रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या वतीने आयोजित रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131क्रिकेट कार्निव्हल स्पर्धेत साखळी फेरीत पुणे सॅटेलाईट, रायगड वॉरियर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदु जिमखाना व शिंदे क्रिकेट मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात भुषण देशपांडे(33 धावा व 2-21) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुणे सॅटेलाईट संघाने व्हिसीए तेलंगणा संघाचा 21 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पुणे सॅटेलाईट संघाने 14षटकात 6बाद 116धावा केल्या. यात भुषण देशपांडे 33, अरविंद चौहान नाबाद 19, महेश घोरपडे 15, देवदत्त देशपांडे 10, निखील राईकर 11 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. याच्या उत्तरात व्हिसीए तेलंगणा संघाचा डाव 12.5षटकात सर्वबाद 95धावावर संपुष्टात आला. यात संजय सीटी 39, नयन वारू 24यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.पुणे सॅटेलाईटकडून भालचंद्र कुलकर्णी(3-13), महेश सोलापूरकर(2-6), भुषण देशपांडे(2-21) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

दुसऱ्या सामन्यात देवेंद्र चौधरी(3-12) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रायगड वॉरियर्स संघाने पिंपरी पँथर संघाचा 7गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. या स्पर्धेचे उदघाटन एमसीएच्या अपेक्स कौन्सिल मेंबर विनायक द्रविड आणि माजी रणजीपटू व माजी एमसीए सिलेक्टर कर्नल गजानन राडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131च्या क्रीडा विभागाचे संचालक रोटेरियन महेश घोरपडे, रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131चे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पुणे सॅटेलाईट: 14षटकात 6बाद 116धावा (भुषण देशपांडे 33(23,4×4,1×6), अरविंद चौहान नाबाद 19, महेश घोरपडे 15, देवदत्त देशपांडे 10, निखील राईकर 11, किरण कुमार 1-9, दुर्गा तिवारी 1-10 ) वि.वि. व्हिसीए तेलंगणा: 12.5षटकात सर्वबाद 95धावा (संजय सीटी 39(21,4×4,1×6), नयन वारू 24, भालचंद्र कुलकर्णी 3-13, महेश सोलापूरकर 2-6, भुषण देशपांडे 2-21); सामनावीर – भुषण देशपांडे; पुणे सॅटेलाईट संघ 21 धावांनी विजयी;
पिंपरी पँथर: 15षटकात 7बाद 99धावा (धीरज कदम नाबाद 31(27,3×4), अतुल भगत 32(22, 4×4,1×6), अविनाश बारणे 10, देवेंद्र चौधरी 3-12, सतीश देवकर 1-17, किरीट पाटील 1-18) पराभुत वि. रायगड वॉरियर्स: 13.1षटकात 3बाद 100धावा (पंकज पाटील 42(30,3×4,2×6), सुमित झुंजारराव 32(25,4×4), सौरभ रावलिया नाबाद 11, सुनिल रोहिला 1-8); सामनावीर – देवेंद्र चौधरी; रायगड वॉरियर्स संघ 7गडी राखून विजयी.